सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Dec 22, 2014

प्रश्न मंजुषा- 39

1. साहित्य क्षेत्रातील मानाचा साहित्य अकादमी अवार्ड 2014 कुणाला जाहीर झाला आहे?

A. अवधूत डोंगरे
B. महेश एलकुंचवार
C. अशोक पवार
D. डॉ. जयंत नारळीकर-----------------------------------------------------------------------------

2. कोणत्या देशात नुकताच बालविवाह विरोधी कायदा पारित करण्यात आला आहे?

A. भूतान
B. थाईलंड
C. म्यानमार
D. बांगलादेश-----------------------------------------------------------------------------

3. State Bank of India ने नुकतेच कोणत्या देशात आपले 150 वर्ष पूर्ण केले आहे?

Oct 21, 2014

प्रश्न मंजुषा- 38

1. न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया इंजिनियर असोसिएशन संशोधकांनी पक्षाची ओळख पटविणाऱ्या कोणत्या apps ची निर्मिती केली आहे?

A. बर्ड प्लेस
B. बर्ड स्न्याप
C. बर्ड केज
D. नो अबाउट बर्ड-----------------------------------------------------------------------------

2. जानेवारी - फेब्रुवारी 2015 मध्ये केरळ राज्यात होणाऱ्या 35 व्या 'राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे'साठी सदिच्छा राजदूत म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे?

A. विश्वनाथ आनंद
B. सायना नेहवाल
C. विराट कोहली
D. सचिन तेंडूलकर-----------------------------------------------------------------------------

3. ब्रिटनच्या अर्थराज्यमंत्री म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेची निवड झाली आहे?

Oct 14, 2014

प्रश्न मंजुषा- 37

1. देशातील विमा उतरविलेला पहिला चित्रपट कोणता?

A. दिल चाहता है
B. शूल
C.ताल
D. प्यार किया तो डरना क्या.-----------------------------------------------------------------------------

2. देशातील पहिले बिगर काँग्रेसी मंत्रिमंडळ प्रस्थापित होणारे राज्य?

A. ओरिसा
B. पश्चिम बंगाल
C. तमिळ नाडू
D. केरळ-----------------------------------------------------------------------------

3. देशातील पहिले तंबाखू मुक्त राज्य कोणते?

Oct 12, 2014

बंधन बँकेच्या ६०० शाखा


मायक्रो फायनान्स कंपनी बंधन पुढच्या वर्षीच्या पूर्वार्धात ६००शाखांसहित नवी बँक सुरू करीत असून त्यासाठी फिडेलिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिस (एफआयएस) तांत्रिक साह्य देणार आहे. या शाखांद्वारे एक कोटी ग्राहक जमवण्याचे बंधन बँकेचे ध्येय असल्याची माहिती 'एफआयएस'ने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे. बँकेला संपूर्ण तांत्रिक मदत 'एफआयएस'चीच असून युनिव्हर्सल बँकिंगसाठी लागणारे एकात्मिक बँकिंग आणि पेमेंटच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी 'एफआयएस' असेल. 

रिझर्व्ह बँकेने यावर्षी एप्रिलमध्ये दोन वित्तीय कंपन्यांना नवी बँक सुरू करण्याची तत्त्वतः परवानगी दिली आहे. त्यात, आयडीबीआय आणि बंधन या कंपन्यांचा समावेश आहे. बँक सुरू करण्याच्या सर्व तांत्रिक आणि आर्थिक बाबी पूर्ण केल्यानंतर त्याची शहानिशा करून या कंपन्यांना बँकेचे व्यवहार सुरू करण्याची परवानगी रिझर्व्ह बँक देईल. त्यासाठी कंपन्यांना १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. बंधन ही कोलकातास्थित मायक्रोफायनान्स कंपनी आहे तर, आयडीबीआय ही पायाभूत क्षेत्रासाठी वित्तीय साह्य करणारी कंपनी आहे. 


सौजन्य- महाराष्ट्र टाईम्स. 


Oct 8, 2014

प्रश्न मंजुषा- 36

1. रिया रॉय व बरखा रॉय यांना कोणत्या लघुपटासाठी 'सनफ्रान्सिस्को ग्लोबल पुरस्कार' जाहीर झाला आहे?

A. माय फ्रेंड गणेशा
B. माय फ्रेंड हनीफ
C. माय फ्रेंड हुसेन
D. माय फ्रेंड हातीम-----------------------------------------------------------------------------

2. 2014 ची कॅरम विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशातील खेळाडूने जिंकली आहे?

A. भारत
B. थाईलंड
C. दक्षिण कोरिया
D. नेपाळ-----------------------------------------------------------------------------

3. 36 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

Oct 3, 2014

प्रश्न मंजुषा- 35

1. बँकांच्या संचालक पदासाठी Banking Aptitude Test (BAT) घेण्याचे रिझर्व बँकेच्या कोणत्या कमिटीने सुचविले आहे?

A. आर. गांधी कमिटी
B. जी. गोपालक्रिश्नन कमिटी
C. बिमल जालान कमिटी
D. रघुराम राजन कमिटी-----------------------------------------------------------------------------

2. MCX- SX या शेयर बाजाराचे नाव बदलून कोणते नवे नाव देण्यात आले आहे?

A. Multi Commodity Exchange
B. Metropolitan Stock Exchange
C. Mumbai Commodity Exchange
D. Metropolitan Commodity Stock Exchange-----------------------------------------------------------------------------

3. राज्यातील पहिल्या National Law University च्या कुलगुरुपदी कुणाची निवड करण्यात आली आहे?

Sep 20, 2014

भारतातील राज्ये आणी त्यातील नृत्यप्रकार

भारतातील राज्ये आणी त्या राज्यातील प्रसिद्ध नृत्यप्रकार खालील प्रमाणे आहे.

-----------------------------------

महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य 

तामिळनाडू --- भरतनाट्यम 

केरळ --- कथकली 

आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम 

पंजाब --- भांगडा, गिद्धा 

गुजरात --- गरबा, रास

Sep 19, 2014

प्रश्न मंजुषा- 34

1. यशदाच्या 'मानव विकास अहवालात' महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा प्रथम क्रमांक लागतो.?

A. औरंगाबाद
B. नागपूर
C. पुणे
D. नाशिक-----------------------------------------------------------------------------

2. चौथे 'मराठी संत साहित्य संमेलन' कोठे होणार आहे?

A. नागपूर
B. चंद्रपूर
C. यवतमाळ
D. नांदेड-----------------------------------------------------------------------------

3. 17 व्या आशियायी क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात पार पडणार आहे?

Sep 12, 2014

स्पर्धा परीक्षा लेखक/लेखिका व्हायचंय...???

सध्याचा काळ हा स्पर्धा परीक्षेचा आहे. जो-तो स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. कुणी UPSC, कुणी MPSC, कुणी बँकिंग तर कुणी वर्ग 3 च्या परीक्षेची तयारी करीत आहे. त्यातल्या त्यात आता online तयारीच महत्व खूप वाढलं आहे. एका क्लिक वर स्पर्धा परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. माहितीच संपूर्ण भांडारच आपल्या समोर उपलब्ध झालं आहे. अश्यातच काही होतकरू स्पर्धक असे आहेत कि त्यांच्यात स्पर्धा परेक्षेसंबंधी लिहिण्याची सुप्त इच्छा असते परुंतु त्यांना तो प्लेटफोर्म, तो कट्टा उपलब्ध होत नाही आणी मग त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत नाही.
परंतु, मित्रांनो आता चिंता करण्याच काहीच कारण नाही कारण आता हाच प्लेटफोर्म, कट्टा आम्ही म्हणजेच MPSC Alert आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहे. तेव्हा भरपूर लाभ घ्या ह्या सेवेचा आणी आपल्या सुप्त गुणाला वाव देत इतरांनाही  मदत करा.


= काय लिहाल ?

मित्रांनो, तुम्ही MPSC Alert ला 'प्रश्न मंजुषा' लिहून पाठवू शकता. तसेच तुम्हाला एखाद्या 'मुलाखतीचा अनुभव' असल्यास तो सुधा आमच्याकडे खाली दिलेल्या पत्यावर पाठवू शकता. आम्ही आपली प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव आपल्या नावासहित MPSC Alert वर पोस्ट करू. जेणेकरून आपल्या ज्ञानाचा/अनुभवाचा इतरांना फायदा होईल.


= कसे लिहाल ?

*= प्रश्न मंजुषा' पाठवायची असल्यास-

1. एका प्रश्न मंजुषेत कमीत कमी 10 प्रश्न असावेत.
2. ती सर्वी प्रश्न देवनागरी लिपीतच म्हणजे मराठी फोन्ट वापरून लिहिली असावी. (मराठी लिहिण्याकरिता तुम्ही मराठी translator चा वापर करू शकता.)
3. प्रेत्येक प्रश्नाखाली त्याचे 4 पर्यत आणी त्या खाली त्याचे उत्तर अश्या स्वरुपात 10 प्रश्न असावीत.
4. उत्तर चुकीचे असल्यास किवा typing mistek असल्यात प्रश्न मंजुषा पोस्ट केल्या जाणार नाही.
5. आपण पाठविलेल्या प्रश्न मंजुषेत जर पूर्वीच MPSC Alert वर पोस्ट झालेले प्रश्न असतील तर असे प्रश्न पोस्ट केल्या जाणार नाही.

*= 'मुलाखत अनुभव' पाठवायचा असल्यास-

1. मुलाखत अनुभव मराठी फोन्ट वापरून लिहिला असावा. (मराठी लिहिण्याकरिता तुम्ही मराठी translator चा वापर करू शकता.)

= प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव पाठवतांना खाली आपले नाव आणी राहणाऱ्या गावाचे/शहराचे नाव अवश्य लिहावे.= प्रश्न मंजुषा/ मुलाखत अनुभव खालील पत्यावर mail करा 

E-mail-  mpscalert@gmail.comधन्यवाद.

Admin
MpscAlert 

Sep 9, 2014

प्रश्न मंजुषा- 33

1. 'एक भारत- एक दर' हि योजना कोणत्या मोबाईल नेटवर्क कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे?

A. वोडाफोन
B. BSNL
C. एअरटेल
D. रिलायंस-----------------------------------------------------------------------------

2. कोणत्या गावाला 'देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव' होण्याचा मान मिळाला आहे?

A. चंडीगड
B. गरीफेमा (Nagaland )
C. हुगळी ( पश्चिम बंगाल )
D. लेखा-मेंढा (महाराष्ट्र)-----------------------------------------------------------------------------

3. यंदाचा 'पेन प्रिंटर' पुरस्कार कुणत्या भारतीयाला प्राप्त झाला आहे?

Sep 7, 2014

प्रश्न मंजुषा- 32

1. फाईल शोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'फाईल कॉम्प्रेसर' चा पहिला प्रयोग कोणत्या जिल्हाधिकारी कार्यालयात अरण्यात आला आहे?

A. सिंधुदुर्ग
B. वर्धा
C. चंद्रपूर
D. परभणी-----------------------------------------------------------------------------

2. देशाचे नवे सोलीसीटर जनरल कोण?

A. सी. मोहन राव
B. अश्विनी कुमार
C. रणजीत कुमार
D. मनोविज्ञ मिश्रा-----------------------------------------------------------------------------

3. 2006 साली महाराष्ट्र राज्याने कितवे औद्योगिक धोरण जाहीर केले?

Aug 29, 2014

प्रश्न मंजुषा- 31

1 माराकेश करार कश्याशी संबंधित आहे?.

A. ब्रेल लिपी अद्यावातिकरणासंबंधी
B. दृष्टीहिनांना अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यासंबंधी
C. अपंगांना स्वस्तात साहित्य उपलब्ध करून देण्यासंबंधी
D. या पैकी नाही-----------------------------------------------------------------------------

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कुणाची निवड झाली आहे?

A. डॉ. बी ए. चोपडे
B. डॉ. आर. पांढरीपांडे
C. डॉ. विलास सपकाळ
D. डॉ. विनोद सदाफुले-----------------------------------------------------------------------------

Aug 22, 2014

मुलाखतीची तयारी

नोकरी संपादन करण्याच्या प्रक्रियेत मुलाखतीला सामोरे जावे लागते. आत्मविश्वासाने मुलाखत देताना कोणती पथ्ये पाळावीत आणि कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, याविषयी..

तुमची शैक्षणिक कारकीर्द उत्तम असली तरीही नोकरी संपादन करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या मुलाखतीची तयारी ही तुम्हाला करावीच लागते. मुलाखत देणे हे शिकता येण्याजोगे कौशल्य आहे आणि 'फर्स्ट इम्प्रेशन'ची छाप उमटण्याकरता तुम्हाला मुलाखतीत दुसरी संधी मिळत नसते. म्हणूनच मुलाखतीला जाताना काही पथ्ये बाळगणे आणि काही कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. 

० देहबोली : मुलाखतीच्या वेळेस मुलाखतकाराचे तुमच्या बोलण्याकडे तर लक्ष असतेच. मात्र बोलण्याच्या पलीकडे तुमच्या देहबोलीतून संवाद साधला जात असतो. त्याकडेही मुलाखतकाराचे बारीक लक्ष असते. सरळ उभे राहणे, नजरभेट होणे, आत्मविश्वासपूर्वक हस्तांदोलन करणे अशा सुरुवातीच्या अनेक छोटय़ा- छोटय़ा गोष्टींनी मुलाखतीच्या वेळेस तुमचे व्यक्तिमत्त्व जोखले जाते.

Aug 15, 2014

जगातील 10 महागडी चलन

जागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अमेरिका आणी त्याच्या ह्या चलनाला जागतिक स्तरावर दबदबा आहे. अमेरीकेचे जागतिक बँकेवर असणारे वर्चस्व तसेच जगातील सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था ह्याचा देखील परीणाम जागतिक व्यापारावर होत असतो. आपण देखील आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात करतो. त्याच प्रमाणे युरोपियन देशामध्ये आणी युरोपियन युनियन मध्ये वापरले जाणारे 'युरो' हे देखील जागतिक स्तरावरील एक महत्वाचे चलन आहे. त्याच प्रमाणे युनायटेड किग्डमचे 'स्टर्लिंग पौंड' हे देखील एक महत्वाचे चलन आहे. 

ही सर्वी चलने जागतिक स्तरावर महत्वाची तर आहेतच आणी आपण सर्वांना ज्ञात सुधा आहे परंतु जगात अजूनही असे काही चलने आहेत जी जागतिक स्तरावर डॉलर एवढी महात्वाची नाही आणी आपणाला ज्ञात ही नाही परंतु त्यांचे मूल्य प्रचंड आहे. त्यातील जास्तीत जास्त चलने ही तेल समृद्ध अश्या आखाती देशातील आणी आर्थिक समृद्ध असणाऱ्या युरोपातील आहे. तेलाच्या व्यापारामुळे आणी जागतिक स्तरावर होणात्या प्रचंड उलाढालीमुळे त्यांचे मूल्य आपल्या रुपयाच्या तसेच डॉलर च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. अर्थात त्याला इतरही आर्थिक कारणे आहेत.

आज आपण ती चलने बघत आहोत ज्याची जागतिक स्तरावरील मूल्य प्रचंड वधारले आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो कुवेत देशाच्या 'कुवेत दिनार' चा....
(चलनाचा हा दर '25-7-2014-शुक्रवार' नुसार घेतलेला आहे)


1- कुवेत दिनार  (1 कुवेत दिनार= 212.37 रुपये)

कुवेत या आखाती देशाचे असलेले 'दिनार' हे चलन रुपयाच्या तसेच डॉलरच्या तुलनेत सर्वात महाग आहे. 1 दिनार साठी आपल्यला तब्बल 212 रुपये किवा 3.54 अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहे.
Aug 7, 2014

प्रश्न मंजुषा- 30

1. 'गन फॉर ग्लोरी' ही संस्था कोणत्या खेळाडूची आहे?

A. अभिनव बिंद्रा
B. अंजली भागवत
C. राज्यवर्धन राठोड
D. गगन नारंग-----------------------------------------------------------------------------

2. भारतात सर्वप्रथम मोबाईल नंबर पोर्टबिलीटी कोणता राज्यात सुरु झाली?

A. महाराष्ट्र
B. हरियाना
C. गुजरात
D. तमिळनाडू-----------------------------------------------------------------------------

3. गरीब महिलेला आर्थिक सहाय्य करण्यासाठी 'राणी लक्ष्मीबाई पेन्शन योजना' कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

Aug 5, 2014

प्रश्न मंजुषा- 29

1. विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या मूल्यमापनासाठी कोणच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती?

A. राजेश मोहन समिती
B. नरेंद्र जाधव समिती
C. उषा मेहरा समिती
D. हरी गौतम समिती-----------------------------------------------------------------------------

2. कोणत्या देशाने 2014 च्या कॉमनवेल्थ मध्ये सर्वाधिक पदे मिळविली आहे?

A. इंग्लंड
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. कॅनडा-----------------------------------------------------------------------------

3. 21 वे कॉमनवेल्थ गेम्स कुठे होणार आहे?

Aug 1, 2014

प्रेरणादायी

यांच्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. माणूस तोच मोठा होतो जो आधी लहान असतो. व तोच उंच भरारी घेऊ शकतो ज्याच्या पंखावर कसलाच भार नसतो. म्हणून आजच्या परिस्थितीची चिंता करू नका. भरपूर मेहनत घ्या, जिद्दीने प्रयत्न करत रहा, प्रयत्नात सातत्य राखा आणी नेहमी आशावादी राहा, एक वेळ नक्कीच तुमची येईल जी तुमची स्वप्न पूर्ण करेल. म्हणून लगे राहो.......

Jul 30, 2014

महाराष्ट्रा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे 21 जागा (Non- Teaching)

महाराष्ट्रा पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे शिक्षकेत्तर कर्मचारी आणी अधिकाऱ्याच्या एकून 21 जागा (Non- Teaching) आहे.

उपकुलसचिव (Deputy Registrar)- 2 जागा
सहाय्यक कुलसचिव (Assistant Registrar)- 4 जागा
सहाय्यक नियंत्रक (Assistant controller)- 2 जागा
सहाय्यक तांत्रिक अधिकारी (Assistant Technical Officer)- 1 जागा

अजून इतरही पदाच्या 12 जागा आहेत त्यासाठी जाहिरात पहा.

अंतिम दिनांक- 16-08-2014

संकेतस्थळ (Website)- http://www.mafsu.in/

Jul 29, 2014

प्रश्न मंजुषा- 28 (राज्यघटना Special)

1. नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचे हनन झाले असता ते कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात?

A. कलम 20
B. कलम 21
C. कलम 17
D. कलम 32-----------------------------------------------------------------------------

2. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी काम करण्यावर बंदी कोणत्या कलमान्वये घालण्यात आली आहे?

A. कलम 22
B. कलम 24
C. कलम 14
D. कलम 16-----------------------------------------------------------------------------

3. आणीबाणीच्या काळात कोणत्या कलमान्वये प्राप्त झालेले अधिकार स्थगित करता येत नाही?

Jul 26, 2014

प्रश्न मंजुषा- 27

1. कार्यालयीन पत्रव्यवहारासाठी राज्य सरकारने कोणत्या संकेतस्थळाच्या वापरास बंदी घातली आहे?

अ. G mail
ब. Yahoo
क. Rediff

A. अ आणी ब
B. अ आणी क
C. फक्त अ
D. ब आणी क-----------------------------------------------------------------------------

2. राज्य शासनाने सर्व विभागांना त्यांच्या नियोजित व अनियोजित अर्थसंकल्पाच्या किती टक्के रक्कम 'ई-प्रशासन' उपक्रमासाठी वापरणे बंधनकारक केले आहे?

A. 0.5%
B. 2%
C. 5%
D. 7.5%-----------------------------------------------------------------------------

3. चुकीचे विधान ओळखा.

Jul 22, 2014

प्रश्न मंजुषा- 26

1. CSR अंतर्गत सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून CCTV कॅमेरे भाड्याने देणे, त्याची देखभाल, मॉनीटर, हार्ड डिस्क याची जबाबदारी ई. माफक दरात घेणाऱ्या 'Security as a service' ही संकल्पना कोणत्या कंपनीद्वारे राबविण्यात येत आहे?

A. टाटा
B. झेन्सार
C. झायकोम
D. सिगेट-----------------------------------------------------------------------------

2. कोणत्या टेनिस खेळाडूतर्फे International tennis premier league सुरु करण्यात येत आहे?

A. लियांडर पेस
B. महेश भूपती
C. विजय अमृतराज
D. राफेल नदाल-----------------------------------------------------------------------------

3. 1845 मध्ये कुणी 'इंडियन रेल्वे असोसीएशन' ची स्थापना केली?

Jul 21, 2014

प्रश्न मंजुषा- 25

1. अलीकडेच निधन पावलेले जहांगीर पोचा हे कोणत्या 'चित्रवाणी वाहिनीचे' संपादक होते?

A. बोस्टन ग्लोव्ह
B. दि नेशन
C. न्यूज डेली
D. न्यूज एक्स-----------------------------------------------------------------------------

2. सद्या प्रकाशझोतात असणाऱ्या आणी शेयर बाजाराशी संबंधित असणाऱ्या NSEL चे पूर्ण रूप काय?

A. National Stock Exchange Ltd
B. National Spot Exchange Ltd
C. National Store Exchange Ltd
D. National Security Exchange Ltd-----------------------------------------------------------------------------

3. सद्या पेट्रोल आणी पेट्रोलियम पदार्थाचा इंधन म्हणून वापर करतेवेळी त्यामध्ये किती टक्के (%) 'इथेनॉल' मिसळविणे अनिवार्य आहे?

Jul 19, 2014

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात 36 जागा

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात उप कुलसचिव (1 जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा), सिस्टिम प्रोग्रामर (1 जागा), सहायक कुलसचिव (1 जागा), कनिष्ठ अभियंता –स्थापत्य (1 जागा), भांडारपाल (2 जागा), लघुलेखक (2 जागा), सांख्यिकी सहायक (१ जागा), ओव्हरसियर/आवेक्षक (1 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (2 जागा), गार्डन असिस्टंट (1 जागा), कनिष्ठ सहायक (8 जागा), वाहनचालक (3 जागा), पंप ऑपरेटर (1 जागा), सहायक प्लंबर (1 जागा), शिपाई (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुलै 2014 आहे. 

अधिक माहिती www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Jul 17, 2014

रिझर्व बँकेत असिस्टनच्या 506 जागा
रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टन पदाच्या 506 जागेसाठी जाहिरात आली आहे.

पद:- असिस्टन.

पात्रता:- खुल्या गटातील आणी OBC साठी कुठल्याही शाखेची पदवी 50% मार्कांसहित उत्तीर्ण आणी इतरांसाठी कुठल्याही शाखेची पदवी परंतु मार्कांची अट नाही.

फी:- रु 450/- Open आणी OBC साठी आणी रु 50/- SC, ST व महिलांसाठी.

जाहिरात येथून पहा:- जाहिरात

अर्ज येथून भरा:- Apply

अर्ज भरण्याची अंतिम तारीख- 06-08-2014.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात 220 जागा

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयात अतांत्रिक पदाची लिपिक टंकलेखक (174 जागा), लघुटंकलेखक (11 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (32 जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2014 आहे. 

अधिक माहिती व अर्ज www.dmerexam.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Jul 15, 2014

प्रश्न मंजुषा- 24

1. ब्रिटन तर्फे दिला जाणारा 'राष्ट्रीय उपाहारगृह पुरस्कार' यंदा कोणत्या भारतीय उपाहारगृहाला प्राप्त झाला आहे?

A. दि लेडबरी
B. दि क्लोव्ह क्लब
C. मेफेअर
D. दावत-----------------------------------------------------------------------------

2. नुकत्याच केंद्र सरकारला सदर करण्यात आलेल्या 'रंगराजन समिती'च्या अहवालानुसार गरिबीचीमर्यादा ग्रामीण तसेच शहरी भागासाठी किती ठरविण्यात आली आहे?

A. 32 रु , 37 रु
B. 32 रु, 47 रु
C. 35 रु, 45 रु
D. 37 रु, 42 रु-----------------------------------------------------------------------------

3. शरियत न्यायालयाला कायद्याचा कोणताच आधार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने दिला आहे?

Jul 14, 2014

प्रश्न मंजुषा- 23

1. 2014 चा फिफा फुटबॉल वल्डकप कोणत्या संघाने जिंकला आहे?

A. ब्राझील
B. नेदरलंड
C. अर्जेन्टिना
D. जर्मनी-----------------------------------------------------------------------------

2. यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषकातील 'सुवर्ण चेंडू अर्थात Golden Ball' हा खिताब कुणाला मिळाला आहे?

A. जेम्स रोड्रीगेझ
B. थोमास म्युलर
C. लिओनेल मेस्सी
D. रॉबिन व्यान पर्सी-----------------------------------------------------------------------------

3. यंदाचा फिफा फुटबॉल विश्वचषकातील 'सुवर्ण बूट अर्थात Golden Shoes' हा खिताब कुणाला मिळाला आहे?

Jul 12, 2014

पणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालयात 55 जागा

पणन व वस्त्रोद्योग विभाग, रेशीम संचालनालय, नागपूर तर्फे 55 विविध पदासाठी सरळसेवा भरतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

पोस्ट-
रेशीम विकास अधिकारी (वर्ग 2)- 1 पद
प्रयोगशाळा निर्देशक- 7 पदे
क्षेत्र सहाय्यक- 24 पदे
वरिष्ठ सहाय्यक- 3 पदे
आणी इतर पदे.

अंतिम तारीख- 24-7-2014

अर्ज येथून भरा- Apply

जाहिरात येथून पहा- Download

अधीकृत संकेतस्थळाला भेट द्यायची असल्यास- www.reshimexam.com

प्रश्न मंजुषा- 22

1. भारतीय नौदलातील कोणती युद्धनौका 'रिम ऑफ प्यासिफिक' या बहुराष्ट्रीय नाविक सरावासाठी 'पर्ल हार्बर' या बेटावर वर दाखल झाली आहे?

A. आय.एन.एस. विक्रांत
B. आय.एन.एस. विराट
C. आय.एन.एस. ब्रम्हा
D. आय.एन.एस. सह्याद्री-------------------------------------------------------------------------------------------

2. देशातील सर्वाधिक 'महिला पोलीस' कोणत्या राज्याच्या पोलीस दलात आहे?

A. उत्तर प्रदेश
B. पंजाब
C. महाराष्ट्र
D. गुजरात-------------------------------------------------------------------------------------------

3. कोणत्या अमेरिकन सिनेटरने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे?

Jul 9, 2014

महाराष्ट्र वन विकास महामंडळात 185 जागा

महाराष्ट्र शासनचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र वन विकास महामंडळात (फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र) चंद्रपूर प्रदेश कार्यालयात लिपिक (28 जागा), वन रक्षक (77 जागा), वाहनचालक (21 जागा), चौकीदार (2 जागा), शिपाई (2 जागा), तसेच नागपूर प्रदेश कार्यालयात लिपिक (15 जागा), वाहनचालक (7 जागा), वनरक्षक (23 जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (3 जागा), शिपाई (1 जागा) व चौकीदार (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 7 जुलै 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती www.fdcm.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Jul 8, 2014

प्रश्न मंजुषा- 21

1. टेनिस मधील महिला वर्गातील विम्बल्डन 2014 का खिताब कुणी आपल्या नावे केला आहे?

A. सारा एराणी
B. रॉबर्ता विन्सी
C.मारिया शारापोवा
D. पेट्रा क्विटोवा-------------------------------------------------------------------------------------------

2. पश्चिम बंगालचे नवनियुक्त राज्यपाल कोण?

A. राजवीर मिश्रा
B. कमला बेनिवाल
C. डी. वाय. पाटील
D. गोपाल यादव-------------------------------------------------------------------------------------------

Jul 5, 2014

SIDBI मध्ये Assistant Manager च्या 80 जागा

Small Industries Development Bank of India (SIDBI) तर्फे Assistant Manager च्या 80 जागेसाठी जाहिरात आली आहे.

पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी किवा पद्युत्तर पदवी 60% सहित उत्तीर्ण.

फोर्म भरण्याची तारीख- 01-07-2014 ते 20-07-2014

जाहिरात पहा

अर्ज भरा .

IDBI बँकेत Assistant Manager च्या 500 जागा

IDBI बँकेत भरावयाच्या Assistant Manager च्या 500 जागेसाठी बँकेने अर्ज मागवले आहे. यात लेखी परीक्षा पास करणाऱ्याला प्रथम IDBI मणिपाल बँकिंग स्कुल मध्ये 1 वर्षाचा Post Graduate Diploma in Banking and Finance (PGDBF) पूर्ण करावा लागणार आहे. हा डिप्लोमा पूर्ण झाल्यावर त्यांना Assistant Manager म्हणून IDBI मध्ये नौकरी दिली जाणार आहे. या जागेसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

जाहिरात बघण्याकरिता Download येथे क्लिक करा.

फोर्म भरण्यासाठी Apply येथे क्लिक करा.

Jul 4, 2014

प्रश्न मंजुषा- 20

1. कोणत्या संस्थेने भारताच्या उर्जा क्षेत्रात सुधार करण्यासाठी रिपोर्ट जारी केली आहे?

A. IMF
B. UNESCO
C. UNDP
D. World Bank-------------------------------------------------------------------------------------------

2. मूळचे भारतीय असणाऱ्या कोणत्या न्यायाधीशाला सिंगापूरचे 'अटर्नी जनरल' म्हणून नियुक्त करण्यात आले आहे?

A. इंदिरा तालवानी
B. मुकुल रोहतगी
C. अल्पना सिंघ
D. वि. के. राजा-------------------------------------------------------------------------------------------

3. राष्ट्रीय रबर पॉलिसीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे?

A. वरून भांदककर
B. रजनी रंजन रश्मी
C. राजेश शर्मा
D. मनोहर व्यास-------------------------------------------------------------------------------------------

4. इंटरपोलचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण?

A. निको रोसेबर्ग
B. जुयेर्गन स्टोक
C. मार्क सेल्बी
D. एनी पार्कर-------------------------------------------------------------------------------------------

5. कोणत्या राष्ट्रीय उद्यानाचा 'विश्व धरोहर सूची' मध्ये समावेश करण्यात आला आहे?

A. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान
B. कान्हा राष्ट्रीय उद्यान
C. पिलीभीत राष्ट्रीय उद्यान
D. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान-------------------------------------------------------------------------------------------

Jun 29, 2014

प्रश्न मंजुषा- 19 (मराठी व्याकरण Special)

1. अचूक विधान ओळखा.

अ) जे शब्द नामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
ब) जे शब्द सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.
क) जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करतात त्यांना विशेषण म्हणतात.

A. अ आणी ब बरोबर
B. ब आणी क बरोबर
C. अ आणी क बरोबर
D. अ, ब आणी क बरोबर-----------------------------------------------------------------------------

2. 'व्यासंग' या शब्दाचा संधी विग्रह कसा होईल ?

A. व्यास+अंग
B. व्या+आसंग
C. वि+आसंग
D. व्या+संग-----------------------------------------------------------------------------

3. शब्दांच्या खालीलपैकी कोणत्या जाती विकारी आहेत?

अ) नाम, सर्वनाम
ब) विशेषण, क्रियापद
क) क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय
ड) उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय

A. अ आणी ब
B. ब आणी क
C. क आणी ड
D. ड आणी अ-----------------------------------------------------------------------------

4. मराठी व्याकरणात 'समुदायवाचक नामे' तसेच पदार्थवाचक नामे' याची गणना कोणत्या नामात होते?

A. सर्वनामात
B. विशेषनामात
C. सामान्यनामात
D. भाववाचक नामात-----------------------------------------------------------------------------

5. धेर्य, कीर्ती, वात्सल्य ही कोणती नामे आहे?

A. सामान्यनाम
B. विशेषनाम
C. धर्मवाचक नाम
D. पदार्थवाचक नाम-----------------------------------------------------------------------------

Jun 28, 2014

प्रश्न मंजुषा- 18

1. ICC चे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण?

A. एस. श्रीनिवासन
B. मोहन दालमिया
C. एलन आईझाक
D. मुस्तफ्फा कमाल-------------------------------------------------------------------------------------------

2. नुकतेच चाचणी झालेले सोलर उर्जेवर चालणारे विमान कोणते?

A. Solar impulse 1
B. Solar impulse 2
C. Solar apprentice 1
D. Solar apprentice 2-------------------------------------------------------------------------------------------

3. वाणिज्य बँकाची व्यवसाय प्रतिनिधी म्हणून यापुढे कुणाला कार्य करता येणार आहे?

A. शेड्युल बँक
B. इन्शुरन्स संस्था
C. म्युचुअल फंड
D. बिगर बँकिंग वित्तीय संस्था-------------------------------------------------------------------------------------------

4. नवजात अर्भक व मातेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या राज्यातर्फे 'ममता योजना' राबविण्यात येत आहे?

A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. राजस्थान-------------------------------------------------------------------------------------------

5. एवरेस्ट सर करणारी भारतातील सर्वात लहान व्यक्ती कोण?

A. राणी कुमारी
B. सिखा शर्मा
C. ए. शिवानी
D. मालवथ पूर्णा-------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौसेना अकादमीत 375 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौसेना अकादमी परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या द्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 320 व नौसेना अकादमीत 55 अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 जून 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती www.upsc.gov.in  व www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Jun 26, 2014

प्रश्न मंजुषा - 17

1. भारताचे नवे Atorny General कोण?

A. रणजीत कुमार
B. सारंग रोहतगी
C. मुकुल रोहतगी
D. करण शुक्ला-------------------------------------------------------------------------------------------

2. नुकत्याच जागतिक सातही खाड्या पोहण्याचा पराक्रम कोणत्या मराठी मुलाने केला आहे?

A. प्रवीण गुप्ते
B. वीरधवल खाडे
C. विक्रम पतरंगे
D. अमोल आढाव-------------------------------------------------------------------------------------------

3. भारताचे नवे Solicitor general कोण?

A. रणजीत कुमार
B. आशुतोष कपाडिया
C. सुरज बेहेल
D. शशिकांत जोशी-------------------------------------------------------------------------------------------

4. कृषी क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणारे 'वर्ल्ड फुड प्राईज' कुणाला जाहीर झाले आहे?

A. एस. गंगाराम
B. पी. आर. राव
C. संजय राजाराम
D. विजय भारद्वाज-------------------------------------------------------------------------------------------

5. नुकताच 2013 चा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?

A. केदारनाथ सिंग
B. आर. के. नारायण
C. रश्मी बन्सल
D. अरविंद अडिगा-------------------------------------------------------------------------------------------

Jun 22, 2014

संगीत नाटक अकादमीचे उस्ताद बिस्मिला खाँ युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश

संगीत नाटक अकादमीच्या बहुप्रतिष्ठीत उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराची घोषणा सोमवारी नवी दिल्ली येथे करण्यात आली. संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक लोककला या क्षेत्रातील 33 युवा कलाकारांना हा पुरस्कार आज संगीत नाटक अकादमीने जाहीर केला. 

देशभरातील या क्षेत्रातील युवा कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी संगीत नाटक अकादमीद्वारे वर्ष 2006 पासून उस्ताद बिस्मिला खाँ पुरस्कार देण्यात येतात. संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक लोककला या क्षेत्रातील 40 वर्षाखालील कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये संगीत विभागात पुढील कलाकारांचा समावेश आहे. भुवनेश कोमकली (हिंदुस्तानी गायन), कुमार सोमनाथ मर्दुर (हिंदुस्तानी गायन), सावनी तळवलकर (हिंदुस्तानी वाद्य संगीत-तबला), रंजनी व गायत्री बालसुब्रह्मण्यम (कर्नाटक गायन), गायत्री गिरीश (कर्नाटक गायन), एन. गुरुप्रसाद –(कर्नाटक वाद्य संगीत-घटम), बी. सी. मंजुनाथ (कर्नाटक वाद्य संगीत-मृदंगम), अनिरुद्ध अत्रेय (कर्नाटक संगीत-कंजीरा).

भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये 54 जागा

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी (1 जागा), तांत्रिक अधिकारी (14 जागा), वैज्ञानिक सहायक (20 जागा), सहायक (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.bhavinionline.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजरच्या 22 जागा

मुंबई उच्च न्यायालयात व राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालया आस्थापनेवर वरिष्ठ व्यवस्थापक (2 जागा), कोर्ट मॅनेजर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2014 आहे. अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

Jun 3, 2014

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखकाच्या - 1300 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक टंकलेखक-मराठी (408 जागा) व लिपिक टंकलेखक- इंग्रजी (40 जागा) आणि बृह्नमुंबईतील विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक-मराठी (782 जागा), लिपिट टंकलेखक- इंग्रजी (70 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2014 आहे. 
अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

May 31, 2014

प्रश्न मंजुषा- 16

1. ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता नुकत्याच मान्यता मिळालेल्या RuPay या प्रणालीची निर्मिती कुणी केली आहे?

A. Reserve Bank of India
B. C-DAC
C. National Payment Corporation of India
D. National Infomatics Centre (NIC)-------------------------------------------------------------------------------------------

2. भारतातील विद्यापीठात चालणाऱ्या संशोधनाच्या दर्जाचे मूल्यमापन करण्याकरिता कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती?

A. डॉ. के. विजय राघवन
B. डॉ. नरेंद्र जाधव
C. डॉ. विलास सपकाळ
D. डॉ. व्ही. आर. राव-------------------------------------------------------------------------------------------

3. अमेरिकास्थित NASA या संस्थेने 'चंद्राचे वातावरण आणी तेथील धुळीचा' अभ्यास करण्याकरिता कोणते अंतराळ यान प्रक्षेपित केले आहे?

A. लुनार
B. मुणार- 3
C. NSMU
D. LADEE-------------------------------------------------------------------------------------------

4. भारत व रशिया दरम्यान ऑक्टोंबर 2013 मध्ये झालेल्या संयुक्त अभ्यासाचे नाव काय होते?

A. अर्जुन 2013
B. एकलव्य 2013
C. प्रगती 2013
D. इंद्र 2013-------------------------------------------------------------------------------------------

5. नुकताच सापडलेला 'इंडियन मोटेलाईड- विजेचा झटका देणारा मासा' कोणत्या नदीत सापडला आहे?

A. शारदा
B. ब्रम्हपुत्रा
C. गंगा
D. यांगत्से-------------------------------------------------------------------------------------------

May 30, 2014

प्रश्न मंजुषा- 15

1. केंद्र सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नुकतीच कुणाची निवड करण्यात आली आहे?

A. इला पटनाईक
B. सुजाता मेहता
C. अनु आगा
D. हर्शादेन मेहता-------------------------------------------------------------------------------------------

2. इंटरनेट च्या नवीन Li- Fi माध्यमाचा शोध कुणत्या देशाने लावला आहे?

A. रशिया
B. अमेरिका
C. दक्षिण कोरिया
D. चीन-------------------------------------------------------------------------------------------

3. जगातील पहिला मानव विकसित 'रोबोट मानव' कोणता?

A. रोबोटिक एक्सोस्केलेटन
B. रोबोटिक स्केलेटन
C. रोबोटिक ह्युमन
D. रोबोटिक एक्सोह्युमन-------------------------------------------------------------------------------------------

4. C-DAC तर्फे भाषांतरासाठी कोणते Software विकसित करण्यात आले आहे?

A. Speech translator
B. Speech-to-speech
C. Speech-to-Text
D. भाषामनी-------------------------------------------------------------------------------------------

5. केंद्र सरकारतर्फे कुठे प्लास्टिक पार्क उभारण्यात येत आहे?

A. महाराष्ट्र
B. हरियाना
C. गुजरात
D. ओरिसा-------------------------------------------------------------------------------------------

भारताची राज्यघटना

लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.

त्रिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.

घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.

म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.
भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,
आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-

(१) लिखित घटना-

भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.


(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना-

भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.


(३) लोकांचे सार्वभौमत्व-

घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही-

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप-

भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.


(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ-

लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूतहक्क-

भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य-

भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.


(९) एकेरी नागरिकत्व-

अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.


(१०) एकच घटना-

ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.


(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ-

देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती-

भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे-

व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.


(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था-

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.


(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार-

भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा-

भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार-

भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आहे.