सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Aug 29, 2014

प्रश्न मंजुषा- 31

1 माराकेश करार कश्याशी संबंधित आहे?.

A. ब्रेल लिपी अद्यावातिकरणासंबंधी
B. दृष्टीहिनांना अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यासंबंधी
C. अपंगांना स्वस्तात साहित्य उपलब्ध करून देण्यासंबंधी
D. या पैकी नाही-----------------------------------------------------------------------------

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कुणाची निवड झाली आहे?

A. डॉ. बी ए. चोपडे
B. डॉ. आर. पांढरीपांडे
C. डॉ. विलास सपकाळ
D. डॉ. विनोद सदाफुले-----------------------------------------------------------------------------

Aug 22, 2014

मुलाखतीची तयारी

नोकरी संपादन करण्याच्या प्रक्रियेत मुलाखतीला सामोरे जावे लागते. आत्मविश्वासाने मुलाखत देताना कोणती पथ्ये पाळावीत आणि कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, याविषयी..

तुमची शैक्षणिक कारकीर्द उत्तम असली तरीही नोकरी संपादन करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या मुलाखतीची तयारी ही तुम्हाला करावीच लागते. मुलाखत देणे हे शिकता येण्याजोगे कौशल्य आहे आणि 'फर्स्ट इम्प्रेशन'ची छाप उमटण्याकरता तुम्हाला मुलाखतीत दुसरी संधी मिळत नसते. म्हणूनच मुलाखतीला जाताना काही पथ्ये बाळगणे आणि काही कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. 

० देहबोली : मुलाखतीच्या वेळेस मुलाखतकाराचे तुमच्या बोलण्याकडे तर लक्ष असतेच. मात्र बोलण्याच्या पलीकडे तुमच्या देहबोलीतून संवाद साधला जात असतो. त्याकडेही मुलाखतकाराचे बारीक लक्ष असते. सरळ उभे राहणे, नजरभेट होणे, आत्मविश्वासपूर्वक हस्तांदोलन करणे अशा सुरुवातीच्या अनेक छोटय़ा- छोटय़ा गोष्टींनी मुलाखतीच्या वेळेस तुमचे व्यक्तिमत्त्व जोखले जाते.

Aug 15, 2014

जगातील 10 महागडी चलन

जागतिक वित्त बाजारात पैश्याची देवान-घेवाण तसेच जास्तीत जास्त अर्थ व्यवहार हे अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात होत असतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य अमेरिका आणी त्याच्या ह्या चलनाला जागतिक स्तरावर दबदबा आहे. अमेरीकेचे जागतिक बँकेवर असणारे वर्चस्व तसेच जगातील सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्था ह्याचा देखील परीणाम जागतिक व्यापारावर होत असतो. आपण देखील आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलर च्या स्वरुपात करतो. त्याच प्रमाणे युरोपियन देशामध्ये आणी युरोपियन युनियन मध्ये वापरले जाणारे 'युरो' हे देखील जागतिक स्तरावरील एक महत्वाचे चलन आहे. त्याच प्रमाणे युनायटेड किग्डमचे 'स्टर्लिंग पौंड' हे देखील एक महत्वाचे चलन आहे. 

ही सर्वी चलने जागतिक स्तरावर महत्वाची तर आहेतच आणी आपण सर्वांना ज्ञात सुधा आहे परंतु जगात अजूनही असे काही चलने आहेत जी जागतिक स्तरावर डॉलर एवढी महात्वाची नाही आणी आपणाला ज्ञात ही नाही परंतु त्यांचे मूल्य प्रचंड आहे. त्यातील जास्तीत जास्त चलने ही तेल समृद्ध अश्या आखाती देशातील आणी आर्थिक समृद्ध असणाऱ्या युरोपातील आहे. तेलाच्या व्यापारामुळे आणी जागतिक स्तरावर होणात्या प्रचंड उलाढालीमुळे त्यांचे मूल्य आपल्या रुपयाच्या तसेच डॉलर च्या तुलनेत प्रचंड वाढले आहे. अर्थात त्याला इतरही आर्थिक कारणे आहेत.

आज आपण ती चलने बघत आहोत ज्याची जागतिक स्तरावरील मूल्य प्रचंड वधारले आहे. यात पहिला क्रमांक लागतो तो कुवेत देशाच्या 'कुवेत दिनार' चा....
(चलनाचा हा दर '25-7-2014-शुक्रवार' नुसार घेतलेला आहे)


1- कुवेत दिनार  (1 कुवेत दिनार= 212.37 रुपये)

कुवेत या आखाती देशाचे असलेले 'दिनार' हे चलन रुपयाच्या तसेच डॉलरच्या तुलनेत सर्वात महाग आहे. 1 दिनार साठी आपल्यला तब्बल 212 रुपये किवा 3.54 अमेरिकन डॉलर मोजावे लागणार आहे.
Aug 7, 2014

प्रश्न मंजुषा- 30

1. 'गन फॉर ग्लोरी' ही संस्था कोणत्या खेळाडूची आहे?

A. अभिनव बिंद्रा
B. अंजली भागवत
C. राज्यवर्धन राठोड
D. गगन नारंग-----------------------------------------------------------------------------

2. भारतात सर्वप्रथम मोबाईल नंबर पोर्टबिलीटी कोणता राज्यात सुरु झाली?

A. महाराष्ट्र
B. हरियाना
C. गुजरात
D. तमिळनाडू-----------------------------------------------------------------------------

3. गरीब महिलेला आर्थिक सहाय्य करण्यासाठी 'राणी लक्ष्मीबाई पेन्शन योजना' कोणत्या राज्याने सुरु केली आहे?

Aug 5, 2014

प्रश्न मंजुषा- 29

1. विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या मूल्यमापनासाठी कोणच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती?

A. राजेश मोहन समिती
B. नरेंद्र जाधव समिती
C. उषा मेहरा समिती
D. हरी गौतम समिती-----------------------------------------------------------------------------

2. कोणत्या देशाने 2014 च्या कॉमनवेल्थ मध्ये सर्वाधिक पदे मिळविली आहे?

A. इंग्लंड
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. कॅनडा-----------------------------------------------------------------------------

3. 21 वे कॉमनवेल्थ गेम्स कुठे होणार आहे?

Aug 1, 2014

प्रेरणादायी

यांच्याबद्दल तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. माणूस तोच मोठा होतो जो आधी लहान असतो. व तोच उंच भरारी घेऊ शकतो ज्याच्या पंखावर कसलाच भार नसतो. म्हणून आजच्या परिस्थितीची चिंता करू नका. भरपूर मेहनत घ्या, जिद्दीने प्रयत्न करत रहा, प्रयत्नात सातत्य राखा आणी नेहमी आशावादी राहा, एक वेळ नक्कीच तुमची येईल जी तुमची स्वप्न पूर्ण करेल. म्हणून लगे राहो.......