सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Jan 30, 2015

महाराष्ट्र ठरला पंतप्रधान बॅनरचा उपविजेता

MPSC Quiz, Current Affairs


नॅशनल कॅडेट कोर्प्सचा (एनसीसी) सर्वोच्च बहुमान असणाऱ्या पंतप्रधान बॅनरचे उपविजेतेपद यंदा महाराष्ट्राला मिळाले आहे. बुधवारी येथील कॅन्टोनमेंट भागातील डीजी एनसीसी परेड ग्राऊंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंजाबला विजेतेपदाचा तर महाराष्ट्राला उपविजेतेपदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


प्रजासत्ताक दिनानिमित्त 1 जानेवारी 2015 पासून एनसीसी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील 17 एनसीसी विभागातील 2070 कॅडेट्सनी यात सहभाग घेतला होता. या शिबिरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधे अव्वल क्रमांक पटकविणाऱ्या विभागाला पंतप्रधानांच्या हस्ते `पंतप्रधान बॅनर` या बहुमानाने सन्मानित करण्यात येते. आतापर्यंत पार पडलेल्या 23 एनसीसी शिबिरामधे महाराष्ट्राला सर्वात जास्त 17 वेळा हा बहुमान मिळाला आहे. बुधवारी महाराष्ट्राला हा बहुमान मिळाला असता तर गेल्या पाच वर्षांपासून सतत पंतप्रधान बॅनरचे विजेतेपद खिशात घालणाऱ्या महाराष्ट्राला आपले वर्चस्व कायम ठेवता आले असते.यावर्षीच्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाच्या अमन जगताप या कॅडेटने देशभरातील 144 कॅडेटसचे नेतृत्व करून महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवून दिला. महाराष्ट्रातील 37 मुली आणि 76 मुलांसह एकूण 113 एनसीसी कॅडेटसनी या शिबिरात सहभाग नोंदविला होता. कर्नल शहाजी जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे उपप्रमुख मेजर आर.आर. शिंदे, कॅप्टन सुजाता थोरात यांचा महाराष्ट्राच्या एनसीसी पथकात समावेश होता.


स्त्रोत:- माहिती संचालनालय.

भारतीय डाक/ टपाल विभागात- 2426 जागा

टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कल (महाराष्ट्र आणि गोवा राज्य) च्या प्रशासकीय कार्यालये आणि रेल्वे मेल सेवा विभाग, तसेच विविध पोस्टल विभागांमध्ये विविध पदाच्या जागा भरावयाच्या आहे. त्यासाठी खालील पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 

पदे:- 

पोस्टमन (1680 जागा), 
मेल गार्ड (21 जागा), 
मल्टी टास्कींग स्टाफ (725 जागा)

अंतिम दिनांक:- 18 फेब्रुवारी 2015

जाहिरात येथून पहा/ डाउनलोड करा:- Download

महाराष्ट्र वन विभागात- 10 जागा

कार्यकारी संचालक, पेंच व्याघ्र संवर्धन, नागपुर ह्या महाराष्ट्र वन विभागाच्या आधिपत्याखालील संस्थेत विविध पदाच्या 10 जागा कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहे.

पदे:- 
1. Ecologist: 01 post
2. Sociologist: 01 post
3. Livelihood Expert: 01 post
4. GIS Specialist: 01 post
5. Social Mobilizer: 04 posts
6. Office Assistant: 01 post
7. Nature Interpreter: 01 post


फॉर्म भरण्याकरिता किवा विस्तारित जाहिरात पाहण्याकरिता येथे क्लिक करा:- Download

Jan 17, 2015

प्रश्न मंजुषा- 40

1. श्व्याब फाउंडेशनद्वारे देण्यात येणारा 2014 चा 'इंडियन सोशल आन्त्रेप्रेनुयर ऑफ दि इयर' हा पुरस्कार कोणत्या भारतीयाला प्रदान करण्यात आला आहे?

A. नीरज अन्तानी
B. हनुमप्पा सुदर्शन
C. विपुल शहा
D. राजविंदर सिंग तेजी.-----------------------------------------------------------------------------

2. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यातील कामकाज ओनलाइन करण्यासाठी कोणती प्रणाली विकसित करण्यात आली आहे?

A. महा पोलीस नेटवर्क सिस्टीम
B. क्राईम क्रिमिनल आयडेंटीटी नेटवर्क
C. क्राईम क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम
D. ब्युरो ऑफ सायबर क्राईम-----------------------------------------------------------------------------

3. बँकांच्या प्रमुखांचे पद विभाजन म्हणजेच चेयरमन आणी व्यवस्थापकीय संचालक हि पदे वेगवेगळ्या व्यक्तींना दिली जावी म्हणून कोणत्या समितीने RBI कडे शिफारीस केली आहे?