सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Jul 29, 2015

डॉ. अब्दुल कलाम


डॉ. अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य असे की, त्यांच्यावर आजपर्यंत कोणीही एका शब्दानेही ट टीका केलेली नाही. खरे तर त्यांना अनेकदा अनेकांना दुखवावे लागले होते तरीही ते अजातशत्रू राहिले. त्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते पण हे अभिधान मिळवणे हे काही सोपे काम नव्हते. भारताची काही क्षेपणास्त्रे पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे संचालक म्हणून हे काम करून घेताना डॉ. कलाम यांना आपल्या सोबत काम करणार्‍या अनेक अधिकारी, तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ यांच्यात समन्वय साधावा लागला होता. मिसाईलचे सुटे भाग अनेक देशी कंपन्यांकडून तयार करून घेतले होते. अशा एकूण हजारभर कंपन्यांशी समन्वय साधून त्यांच्याकडून काम करून घेणे हीही मोठी कसरतच होती पण तीही डॉ. कलाम यांनी केली.

Jul 14, 2015

महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे संरक्षण अधिकारी पदाच्या 142 जागा

1> महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे 
यांच्या आस्थापनेकर सर्व विभागातील जिल्हांकरिता संरक्षण अधिकारी (142 जागा) 
या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2015 आहे. 
wcdexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 2>  द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) पदाच्या 606 जागा

द ओरिएण्टल इन्श्युरन्स कंपनी लि. मध्ये सहायक (श्रेणी-III) (606 जागा) 
या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2015 आहे. 
अधिक माहिती http://www.orientalinsurance.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Jul 6, 2015

चालु घडामोडी- 06.07.2015

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेच्या ब्रँड ऍम्बेसिडर पदासाठी इन्दौर आयआयटीतील टॉपर 'कृती तिवारी'ची निवड करण्यात आली आहे.


2. फेसबुकने कोणताही विशेष गाजावाजा न करता त्यांच्या फेमस लोगोत बदल केला आहे. मात्र हे करताना ही काळजी घेतली गेली आहे की लोगो बदललाय हे सहजी लक्षातही येऊ नये. नवा लोगो प्रथमदर्शनी जुन्या लोगोप्रमाणेच दिसला तरी त्यात सूक्ष्म बदल आहेत.

3. जगातील सर्वात मोठा स्विमिंग पूल चिली देशातील अल गार्रोबो शहरात असलेल्या सॅन अल्फासो डेल मॅर येथील रिझॉर्टमध्ये तयार करण्यात आला आहे.