शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश

मराठमोळे शरद बोबडे देशाचे नवे सरन्यायाधीश

♦ सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर एस. ए. बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, असे शिफारसपत्र गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला लिहिले आहे. सेवाजेष्ठतेनुसार त्यांनी बोबडे यांच्या नावाची शिफारस केली होती.

♦ त्यानुसार शरद बोबडे हे देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.

♦ यशवंत विष्णू चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणारे पहिले मराठमोळे व्यक्ती होते.

♦ न्यायमूर्ती अरविंद शरद बोबडे (एस. ए. बोबडे) यांचा जन्म 24 एप्रिल, 1956 रोजी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये झाला.

♦ न्यायमूर्ती बोबडे सध्या रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीठाचे सदस्य आहेत. याशिवाय अनेक मोठ्या निकालांमध्ये त्यांचा समावेश होता.

♦ न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल, 2021 रोजी निवृत्त होणार आहेत.

🔎 इतर ➡➡

कलम 124 (1) नुसार संसदेस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या आवश्यकता वाटल्यास वाढवण्याचा अधिकार आहे.

2019 साली नुकतेच - 31 वरून न्यायाधीश संख्या 34 पर्यंत वाढवली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post