सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Dec 19, 2019

जागतिक संघटनेकडून भारताच्या 'खादी' ला HS दर्जा बहाल

जागतिक जकात संघटनेकडून भारताच्या ‘खादी’ याला ‘HS कोड’चा दर्जा बहाल केला

जागतिक जकात संघटनेच्या निर्णयानुसार, भारत सरकारच्या केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने भारताची ओळख समजल्या जाणार्‍या ‘खादी कपडा’ याला स्वतंत्र ‘HS कोड’ बहाल केला आहे. (HS म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टम)

‘HS कोड’ काय आहे?

जागतिक जकात संघटना (WCO) कडून ‘HS कोड’ची स्थापना करण्यात आली आहे. ही बारकोड प्रमाणेच एक सांकेतिक ओळख असते, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा प्रवेशाच्या वेळेस तपासणी अधिकार्‍यांकडून तपासणी केल्या जाणार्‍या मालाला त्यांची परवानगी देण्यामध्ये मदत करते आणि त्यामुळे मंजुरी मिळविण्यास लागणारा वेळ कमी होतो.हे एक बहुउद्देशीय आंतरराष्ट्रीय नामकरण आहे जे दळणवळण केल्या जाणार्‍या वस्तूंच्या प्रकाराचे वर्णन करते. ही ओळख 1974 सालाच्या क्योटो करारनाम्यात नमूद असलेल्या बाबींना अनुसरण तयार करण्यात आली आहे. 200 पेक्षा जास्त देश या व्यवस्थेचा वापर करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक आकडेवारीच्या संकलनात या व्यवस्थेची देशांना मदत होते आणि जकात शुल्कासाठी आधारभूत ठरवले जाते. हे उत्पादनास अधिक चांगल्या प्रकारे पोहोचण्यास मदत करते आणि त्याची जागतिक लोकप्रियता वाढवते.

भारतीय ‘खादी’

खादी म्हणजे हातांनी चरखा किंवा तत्सम यंत्र फिरवून बनवलेले कापूस, सिल्क किंवा लोकरीचे सूत आणि त्यापासून विणलेले कापड. गरमीत थंडपणा तर थंडीत ऊब देणे हे या कापडाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय ते मजबूत आणि टिकाऊ कापड आहे.

खादीला भारताची ओळख असलेले कापड (signature fabric of India) म्हणून मानले जाते. भारतीय ध्वज संहितेनुसार ध्वजासाठी खादी ही एकमेव सामग्री वापरली जाऊ शकते. जर फडकवलेला ध्वज इतर कोणत्याही सामग्रीपासून बनविला गेला असल्यास कायद्यात हा गुन्हा 3 वर्षे कारावास आणि दंड अश्या शिक्षेस पात्र आहे.

भारतात ब्रिटिशांचे राज्य असताना गांधीजींच्या स्वदेशी चळवळीमुळे खादीपासून बनलेल्या कपड्यांचा सर्वात जास्त वापर केला गेला. खादीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 1957 साली भारत सरकारने म्हणजेच ‘खादी व्हिलेज अ‍ॅण्ड इंडस्ट्री कमिशन (KVIC)’ या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था खादीविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करते आहे.

आज खादी कॉटन, खादी लिनेन, खादी सिल्क, खादी वुलन, कॉटन लिनेन खादी, लिनेन सिल्क खादी, इत्यादी अनेक प्रकारांमध्ये खादी कपडा उपलब्ध आहे. सोबतच त्याच्या उत्पादन तंत्रातही नवनवीन शोध केले गेले आहेत. आज खादी अंगात घालण्याच्या किंवा पांघरायच्या कपड्यांपर्यंत मर्यादित राहिलेली नसून ते घरसजावट, विविध आकाराच्या पिशव्या अशा विविध उत्पादनांमध्येही वापरली जात आहे. तसेच खादी उद्योगांच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात वापरात येणार्‍या शाम्पू, साबण अश्या गृह-उपयोगी वस्तू आणि सौंदर्य-सजावटीसाठीची उत्पादने देखील बनवले जात आहेत.

खादीला फॅशनवेअर म्हणून मान्यता मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रयत्न चालले आहेत आणि आज त्याला मागणी देखील आहे. सन 2016च्या आर्थिक पाहणी अहवालातल्या आकडेवारीनुसार पहिल्यांदाच खादी उत्पादनातून तब्बल पन्नास हजार कोटी रूपयांचा खप झाला.

जागतिक जकात संघटना (WCO) विषयी -

जागतिक जकात संघटना (World Customs Organisation -WCO) ही एक आंतरसरकारी संघटना आहे आणि त्याचे ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे मुख्यालय आहे. 26 जानेवारी 1952 रोजी संघटनेची स्थापना झाली.

संघटनेनी आपली सदस्यता सहा क्षेत्रांमध्ये विभागलेली आहे. WCO परिषदेसाठी क्षेत्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचा एक उपाध्यक्ष निवडला जातो. WCO जगभरातल्या 182 जकात प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते, जे एकत्रितपणे सुमारे 98% जागतिक व्यापारावर प्रक्रिया करते.

No comments:

Post a Comment