सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Nov 26, 2020

चालू घडामोडी- २६ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert

 बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातल्या श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर:-

:books:टेस्ला इंक आणि स्पेस एक्सचे फाऊंड एलन मस्क यांनी बिल गेट्सना मागे टाकत जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. ४९ वर्षीय एलन मस्क यांची नेटवर्थ १२७.९ अरब डॉलर्स इतकी झाली आहे.

:books:टेस्लाचे शेअर्स उंचावल्याने त्यांचं नेटवर्थ वाढलं आहे. टेस्लाची मार्केट व्हॅल्यू आता ४९१ अरब डॉलरपर्यंत पोहचली आहे. जानेवारी महिन्यात एलन मस्क हे जगातल्या श्रीमंतांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते.

:books:मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क यांनी जगातल्या श्रीमंताच्या यादीत दुसरं स्थान पटकावलं आहे.

:books:एलन मस्क यांच्या नेटवर्थ १००.३ अरब डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सच्या माहितीनुसार जानेवारीत मस्क हे श्रीमंताच्या यादीत ३५ व्या स्थानावर होते.

:books: आता ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहेत. या वर्षात आत्तापर्यंत एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी १८३ अरब डॉलरच्या संपत्तीसह जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर होते. तर १२८ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर होते.

:books:हे स्थान आता एलन मस्क यांनी पटकावलं आहे. १०२ अरब डॉलर्सच्या संपत्तीसह मार्क झुकरबर्ग हे पाचव्या क्रमांकावर आहेत.

:books:बिल गेट्स हे यांच्या श्रीमंताच्या यादीतील दुसरा क्रमांक हा दुसऱ्यांदा दुसऱ्या कुणाच्या तरी नावावर नोंदवला गेला आहे. बिल गेट्स खरंतर अनेक वर्षांपासून जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होते.

:books:मात्र अॅमेझॉनचे फाऊंडर जेफ बेजोस यांनी २०१७ मध्ये पहिला क्रमांक मिळवला. यानंतर बिल गेट्स दुसऱ्या क्रमांकावर आले. आता हा दुसरा क्रमांक एलन मस्क यांनी मिळवला आहे.

Nov 19, 2020

चालू घडामोडी- १९ नोव्हेम्बर २०२०- MPSC Alert

 1. इंकेटल चॅलेंजर टेनिस स्पर्धा : रामकुमारला उपविजेतेपद:-

:books:भारताचा आघाडीचा टेनिसपटू रामकुमार रामनाथनला वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे रविवारी इकेंटल चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

:books:बिगरमानांकित रामकुमारला २६व्या वाढदिवसाच्या दिवशी अमेरिकेच्या सातव्या मानांकित सेबॅस्टियन कोर्डाकडून ४-६, ४-६ असा पराभव स्वीकारावा लागला. रामकुमारचा पराभव झाला असला तरी या वर्षांतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

:books:या उपविजेतेपदासोबतच त्याने जागतिक क्रमवारीत पहिल्या २०० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या क्रमवारीत ६० गुणांची भर पडली असून त्याला १८५वे स्थान मिळाले आहे.

:books:पहिल्या सेटपासून रामकुमारने चुरस द्यायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या सेटमध्ये तर ४-४ अशी बरोबरी होती. त्यामध्येच रामकुमारला पुढच्या गेममध्ये ४०-० अशी आघाडी मिळाल्याने ५-४ असा गुणफलक करण्याची संधी होती. मात्र तिथे सलग पाच गुण गमावत रामकुमारने सामन्यावरील नियंत्रण पूर्णपणे घालवले होते.

:books:रामकुमार कारकीर्दीत पाचव्यांदा चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावू शकलेला नाही. याआधी तहलीस (एप्रिल २०१७), विनेत्का (जुलै २०१७), पुणे (नोव्हेंबर २०१७) आणि तैपेई (एप्रिल २०१८) येथील चॅलेंजर स्पर्धामध्ये त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

Nov 3, 2020

दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’ कॅनडातर्फे ऑस्करच्या शर्यतीत

 :book

Funny Boy

आंतरराष्ट्रीय ऑस्कर गटात कॅनडाकडून चित्रपट निर्मात्या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ हा चित्रपट पाठवण्यात आला आहे. अर्थात ९३ व्या ऑस्कर पुरस्कार कार्यक्रमात हा चित्रपट कॅनडाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

:books:या वर्गवारीसाठी दीपा मेहता यांना दुसऱ्यांदा संधई मिळत आहे. १५ मार्चला ऑस्करची नामांकने जाहीर होणार आहेत. पुरस्कारप्रदान कार्यक्रम २५ एप्रिलला होणार आहे.

:books:मेहता यांच्या ‘वॉटर’ या चित्रपटास २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रवर्गात नामांकन मिळाले होते. ‘अर्थ’, ‘फायर’ हे त्यांनी दिग्दर्शित केलेले इतर दोन चित्रपट होते.

चालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert

 :small_red_triangle_down:1111

1. यशवर्धन सिन्हा: भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त:small_red_triangle::small_red_triangle:


:cyclone:भारत सरकारने पुढील मुख्य माहिती आयुक्त (CIC) या पदासाठी यशवर्धन सिन्हा यांची निवड केली आहे.

:cyclone:यशवर्धन सिन्हा हे वर्तमानात माहिती आयुक्तपदी आहेत. ते परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी आहेत.

:part_alternation_mark:केंद्रीय माहिती आयोग (CIC) विषयी

:cyclone:केंद्रीय माहिती आयोग ही ‘माहिती अधिकार अधिनियम-2005’च्या तरतूदीनुसार 12 ऑक्टोबर 2005 रोजी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.

:cyclone:आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत-जास्त दहा माहिती आयुक्त असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात.

Oct 21, 2020

उत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत | गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला | SLINEX-20’: भारतीय नौदल सागरी कवायत.

 उत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत 

:tulip:उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

:tulip: १९७१ मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्वात जुना आंतर सरकारी करार असून त्यात पाणथळ जागांचा विकास केला जातो. त्यांची परिसंस्थेचा भाग म्हणून जपणूक केली जाते.

:tulip:रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी ३८ ठिकाणे आहेत. उत्तराखंडमध्ये रामसर दर्जा मिळालेले आसन हे पहिले ठिकाण आहे. येथे माशांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती असून जैवविविधता भरपूर आहे असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण आशियात भारताची एकूण ३८ पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.

:tulip: आसन पाणथळ क्षेत्र उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यत विकासनगर तहसीलपासून १५ कि.मी. अंतरावर आसन पाणथळ क्षेत्र आहे. ४४४.४० हेक्टर क्षेत्रात ते पसरलेले आहे. तेथे ५४ प्रजातीचे पक्षी मध्य आशिया, चीन, रशियातून येतात. ऑक्टोबरमध्ये त्यांचे आगमन होते व मार्चपर्यंत ते वास्तव्य करतात.

May 16, 2020

भारतातील टॉप 5 महिला पोलिस अधिकारी

आता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या देशातील  मिलिटरी आणि पोलिस दलातही महिला उच्च पदांवर कार्यरत आहेत. आज आपण देशातील अशा आघाडीच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांना पाहणार आहोत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की ते कठीण परिस्थितीतही इतके चांगले काम करू शकतात. आयपीएस अधिकारी बनण्याकरिता देशातील यूपीएससीची सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.

Apr 11, 2020

भारतातली व्याघ्र प्रकल्पे

Tiger Sanctuary

भारतात बरीचशी व्याघ्र आहेत त्याची नावे खाली देण्याचा प्रयत्न केला आहे. एखादे नाव सुटल्यास कमेंट मध्ये कळवा म्हणजे इथे Add केल्या जाईल.

💥1) बांदीपूर, कर्नाटक
💥2) कॉर्बेट, उत्तराखंड
💥3) कान्हा, मध्यप्रदेश
💥4) मानस, आसाम
💥5) मेळघाट, महाराष्ट्र
💥6) पलमाऊ, झारखंड
💥7) रणथंबोर, राजस्थान
💥8) सिमिलीपाल, ओडिशा
💥9) सुंदरबन्स, पश्चिम बंगाल
💥10) पेरियार, केरळ

बृहन्मुंबई महानगर पालिकेत कक्ष परिचर पदाच्या 114 जागा

बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विविध विभागांमध्ये कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने विविध रुग्णालयामध्ये रिक्त असलेली 'कक्ष परिचर' हि पदे आर्ज मागवून भरण्यात जाहिरात देण्यात येत आहे.

पदाचे नाव:- कक्ष परिचर 

एकूण पदे:- ११४ 

Mar 29, 2020

प्रश्न मंजुषा- 61 (सामान्य ज्ञान)


1. खालीलपैकी कोणत्या संघटनेला शांतात कार्यासाठी तीन वेळा नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे?


A. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती
B. जागतिक व्यापार संघटना
C. वल्ड हेल्थ ओर्गानैझेषण
D. युनो-----------------------------------------------------------------------------

2. ___________ सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते.?

A. पी/ टी. उषा
B. कृष्ण पुनिया
C. प्रिया श्रीधर
D. कविता राऊत-----------------------------------------------------------------------------

3. कोणता देश भारत व चीन यांच्यातील 'बफर राष्ट्र' म्हणून ओळखला जातो?

Mar 27, 2020

प्रश्न मंजुषा- 60 (चालु घडामोडी)

1. 27 मार्च हा दिवस जागतिक स्तरावर कोणता दिवस म्हणून ओळखला जातो?A. जागतिक रंगमंच दिवस
B. जागतिक हरितउर्जा दिवस
C. जागतिक बाल दिवस
D. जागतिक कामगार दिवस-----------------------------------------------------------------------------

2. 25 मार्च 1898 रोजी साप्ताहिक ‘काळ’ चा पहिला अंक कुणी काढला.?

A. शिवराम परांजपे
B. वासुदादा दामोधर
C. रमेश बापट
D. गोपाल गणेश आगरकर-----------------------------------------------------------------------------

3. सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत?

एमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- 217 पदेएमपीएससी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० - महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० (२१7 रिक्त)

(सदर जाहिरात सविस्तर बघण्याकरिता खाली दिलेल्या 'पुढे वाचा' वर क्लिक करा.)


Mar 20, 2020

बारावीत दोनदा नापास झालेला वैभव नवले PSI च्या परीक्षेत राज्यात पहिला


बारावीच्या परिक्षेत दोनदा नापास तर राज्य लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्याच परिक्षेच्या प्रयत्नात बाजी मारत करमाळ्याच्या वैभव अशोक नवलेने महाराष्ट्र पहिला येत पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान होण्याची संधी मिळवली आहे. विशेष म्हणजे वैभव मागील परिक्षेत पहिलाच प्रयत्न असतानाही अवघ्या एका मार्काने अपयशी ठरला होता तर तालुक्यातुन आठ जण परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण यंदा मागील अपयश धुऊन लावत वैभवने परिवारासह तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमावले आहे.

Mar 19, 2020

IIM Nagpur येथे विविध पदाच्या जागा


Indian Institute of Nagpur (IIM Nagpur) येथे खालील पदाच्या विविध जागा.


1. Manager – Executive Education Programmers (EEP)

Qualification and Experience:
  • Post – Graduation in Management
  • Minimum 5 years’ experience of handling – business development, corporate training activities.
  • Experience in managing programme delivery and coordination.

2. Executive – Field Study Office

Qualification:
  • Post graduate degree/diploma in Business Management preferably in Marketing.
  • SSC, HSC and degree with minimum of 55%.

3. Executive Assistant (Director’s Office)

Qualification:

सुदर्शन पटनाईक- इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार विजेता

🔰🔰सुदर्शन पटनाईक: 'इटालियन गोल्डन सँड आर्ट पुरस्कार विजेता🔰🔰

🚦पहिला भारतीय वालुकाचित्र कलाकार

🚦इटलीमधील 'International Scorrna Sand Nativity Fete' मध्ये सत्कार

🚦सुदर्शन पटनाईक यांच्या कृतीबद्दल
स्पर्धा सहभाग: रशियन कलाकार पावेल मिनील्कोव्ह (Pavel Minilkov) सोबत

🚦कलाकृती: महात्मा गांधींचे १० फूट उंच वाळूचे शिल्प

🚦विविध देशांतील नामांकित शिल्पकारांचा सहभाग

🎯सुदर्शन पटनाईक यांच्याबद्दल थोडक्यात :-