Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi | MPSC Daily Notes

Current Affairs in marathi

 

उत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत 

:tulip:उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला आहे.आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

:tulip: १९७१ मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्वात जुना आंतर सरकारी करार असून त्यात पाणथळ जागांचा विकास केला जातो. त्यांची परिसंस्थेचा भाग म्हणून जपणूक केली जाते.

:tulip:रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी ३८ ठिकाणे आहेत. उत्तराखंडमध्ये रामसर दर्जा मिळालेले आसन हे पहिले ठिकाण आहे. येथे माशांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती असून जैवविविधता भरपूर आहे असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण आशियात भारताची एकूण ३८ पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.

:tulip: आसन पाणथळ क्षेत्र उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यत विकासनगर तहसीलपासून १५ कि.मी. अंतरावर आसन पाणथळ क्षेत्र आहे. ४४४.४० हेक्टर क्षेत्रात ते पसरलेले आहे. तेथे ५४ प्रजातीचे पक्षी मध्य आशिया, चीन, रशियातून येतात. ऑक्टोबरमध्ये त्यांचे आगमन होते व मार्चपर्यंत ते वास्तव्य करतात.

गोवा सरकारने ई लर्निंग प्लॅटफॉर्म DISHTAVO सुरू केला....

:diamond_shape_with_a_dot_inside: गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोवा सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या (डीएचई) उपक्रमाच्या DISHTAVO यूट्यूब चॅनलचे उद्घाटन केले.

:diamond_shape_with_a_dot_inside:DISHTAVO - Digital Integrated System for Holistic Teaching and Virtual Orientations

:diamond_shape_with_a_dot_inside: डिस्टावो प्रोग्रामचे उद्दिष्ट गोवा विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांसाठी अभ्यासक्रमाच्या व्हिडिओ लेक्चरच्या स्वरूपात ऑनलाइन ई-सामग्री तयार करणे आहे.

SLINEX-20’: भारतीय नौदल आणि श्रीलंकी नौदल यांची संयुक्त सागरी कवायत.:sparkle:

:o2:भारतीय नौदल आणि श्रीलंकी नौदल यांच्यादरम्यानची ‘SLINEX-20’ नामक आठवी द्विपक्षीय सागरी कवायत 19 ते 21 ऑक्टोबर 2020 या काळात आयोजित करण्यात आली.

:eight_pointed_black_star:ठळक बाबी.....

:o2:श्रीलंकेच्या त्रिनकोमाली येथे ही कवायत चालणार आहे.श्रीलंका नौदलाच्या SLN शिप्स सयूरा आणि SLN गजबाहू या नौका तर भारतीय बनावटीच्या ASW कॉर्वेटेस कामोर्ता आणि किलतानुन्दर या नौकांचा या कार्यक्रमात सहभाग आहे.त्याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाचे प्रगत लाईट हेलिकॉप्टर (ALH) आणि चेतक हेलिकॉप्टर IN जहाजांवर आहेत तसेच डोर्निअर मेरीटाइम पॅट्रोल विमानही यात सहभागी होणार आहेत.

:o2:‘SLINEX-20’ याचा उद्देश आंतर-परिचालन क्षमता वाढवणे, परस्पर समन्वय सुधारणे आणि दोन्ही नौदलादरम्यान बहु-आयामी सागरी परिचालनाच्या सर्वोत्तम पद्धती आणि प्रक्रियेचे आदानप्रदान करणे हा आहे.
SLINEX कवायतीची मालिका भारत आणि श्रीलंका या देशातल्या दृढ सहभागाचे उदाहरण आहे, ज्याने सागरी क्षेत्रात परस्पर सहकार्य मजबूत केले आहे. अलिकडच्या वर्षांत भारताच्या ‘शेजारी प्रथम’ धोरणानुसार आणि ‘क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ (सागर/SAGAR) या पंतप्रधानांच्या कल्पनेच्या अनुषंगाने दोन्ही देशांच्या नौदलांमधील संवादात देखील लक्षणीय वाढ झाली आहे.

:eight_pointed_black_star:श्रीलंका देश....

:o2:श्रीलंका हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेला असलेला एक द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान 31 कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालची खाडी तर दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. श्री जयवर्धनेपुरा कोट ही श्रीलंकेची राजधानी आहे आणि श्रीलंकी रूपया हे राष्ट्रीय चलन आहे.

-------------------------------------------------------------------------------------------

हे सुध्हा वाचा : 
-------------------------------------------------------------------------------------------

Spardhankur  (युट्यूब चॅनेल):

https://www.youtube.com/channel/UCLM5rHq-TdFhg9desmbBzPw


स्पर्धांकुर MPSC (टेलिग्राम ग्रुप):

https://t.me/spardhankur


MPSC संपूर्ण तयारी (टेलिग्राम चॅनेल):

https://t.me/official_mpscalert


स्पर्धा परीक्षा माहिती मंच( फेसबुक पेज):

www.facebook.com/spardhankur

Post a Comment

Previous Post Next Post