चालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert

 :small_red_triangle_down:1111

1. यशवर्धन सिन्हा: भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त:small_red_triangle::small_red_triangle:


:cyclone:भारत सरकारने पुढील मुख्य माहिती आयुक्त (CIC) या पदासाठी यशवर्धन सिन्हा यांची निवड केली आहे.

:cyclone:यशवर्धन सिन्हा हे वर्तमानात माहिती आयुक्तपदी आहेत. ते परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी आहेत.

:part_alternation_mark:केंद्रीय माहिती आयोग (CIC) विषयी

:cyclone:केंद्रीय माहिती आयोग ही ‘माहिती अधिकार अधिनियम-2005’च्या तरतूदीनुसार 12 ऑक्टोबर 2005 रोजी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.

:cyclone:आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत-जास्त दहा माहिती आयुक्त असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात.

2. भारतीय रेल्वेचा ‘ऑपरेशन मेरी सहेली’ उपक्रम.:hibiscus::hibiscus:

:beginner:भारतीय रेल्वेच्यावतीने संपूर्ण प्रवासामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागांमध्ये ‘मेरी सहेली’ नामक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या सुरक्षेवर भर दिला जाणार आहे.

:red_circle:उपक्रमाविषयी....

:beginner:रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) पुढाकाराने महिला प्रवाशांबरोबर संवाद साधला जात आहे. विशेषतः ज्यावेळी एकट्या महिला प्रवास करतात, अशा महिलांबरोबर बोलून प्रवासादरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देण्यात येत आहे.

:beginner:त्यांना प्रवासामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली तर 182 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधण्याविषयी सांगण्यात आले.

:beginner:कार्य करताना रेल्वे सुरक्षा दलाच्या गटाकडून केवळ महिलांसाठी आरक्षित झालेले आसन क्रमांक एकत्रित केले जातात.

:beginner:त्या महिला प्रवाशांना प्रवासामध्ये कोणकोणती स्थानके लागणार आहेत आणि गाडी कोठे थांबणार आहे, याची माहिती दिली जाते. तसेच एकट्या महिला प्रवाशांकडे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी लक्षही ठेवतात.

:beginner:गंतव्य स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाकडून संबंधित महिला प्रवाशांकडून अभिप्राय नोंदवून घेतले जात आहेत. या अभिप्रायाच्या विश्लेषणानंतर आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा सेवेमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.

:beginner:महिला प्रवाशांना रेल्वे प्रवासामध्ये काही त्रास झाला तर त्या समस्येचा निपटारा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केला जात आहे.

3. 

3333323ihlkhi---3
न्यूझीलँड देशाचे नवीन पंतप्रधान - जॅकिंडा एर्डर्न.

27 ऑक्टोबर 2020 रोजी प्रथम ‘____ स्टार्टअप फोरम’ या कार्यक्रमाचा आरंभ केला जाणार - शांघाय सहकार संघटना (SCO).

भारत सध्या 35 हजारपेक्षा जास्त स्टार्टअप कंपन्यांसह जगातली _ सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था आहे – तिसरी.

‘UNSC ठराव 2231’च्या अटींनुसार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) यांनी या देशावर लादलेली शस्त्रे विक्री बंदी 18 ऑक्टोबर 2020 रोजी रद्द करण्यात आली - इराण.

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020 (ग्लोबल हंगर इंडेक्स) याच्या यादीत भारताचा क्रमांक – 94 वा ('गंभीर' श्रेणी).

महिला प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी भारतीय रेल्वेनी घेतलेला पुढाकार - 'मेरी सहेली'.


Post a Comment

Previous Post Next Post