सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Apr 6, 2021

पंतप्रधान पदाबद्दल महत्त्वपूर्ण फॅक्ट्स.

 :r

1980 च्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंतप्रधानपदी नियुक्ती होण्यासाठी त्यांनी लोकसभेत बहूमत सिद्ध करावे असे घटनेत म्हटलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीस आधी पंतप्रधानपदी नियुक्त करून त्यानंतर ठराविक कालावधीमध्ये आपले बहुमत लोकसभेत सिद्ध करण्यास सांगू शकतात.

1. चरण सिंग (1979)

2. व्ही. पी. सिंग (1989)

3. चंद्रशेखर (1990)

4. पी. व्ही. नरसिंहराव (1991)

5. अटल बिहारी वाजपेयी (1996)

6. एच. डी. देवगौडा (1996)

7. आय. के. गुजराल (1997)8. अटल बिहारी वाजपेयी (1998)

यांनी पद धारण केल्यानंतर बहुमत सिद्ध केले.

:large_blue_circle: पंतप्रधानपदी नियुक्त झालेले मुख्यमंत्री :

1. मोरारजी देसाई (मुंबई राज्य)

2. चरणसिंग (उत्तर प्रदेश)

3. व्ही. पी. सिंग (उत्तर प्रदेश)

4. पी. व्ही. नरसिंहराव (आंध्रप्रदेश)

5. एच. डी. देवेगौडा (कर्नाटक)

6. नरेंद्र मोदी (गुजरात) 2001 ते 2014 या कालावधीत ते चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते.

No comments:

Post a Comment