Maharashtra Information in Marathi | महाराष्ट्राचा संक्षिप्त आढावा


maharashtra

महाराष्ट्र भौगोलिक स्थान क्षेत्रफळ - Maharashtra Geographical Location and Area:


दिनांक मे, १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाली.


महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ,०७,७१३ चौ. कि. मी. इतके आहे.

 

विस्तार- Details:


महाराष्ट्राची पुर्व-पश्र्चिम जास्तीत जास्त लांबी ८०० कि. मी. आणि उत्तर-दक्षिण जास्तीत जास्त लांबी ७०० कि.मी. आहे.


महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा राजस्थान, मध्यप्रदेशनंतर भारतात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी (३२,८७,२६३ चौ. कि.मी.) .३६ % इतका हिस्सा महाराष्ट्राने व्यापला आहे.


महाराष्ट्राच्या वायव्येस-गुजरात राज्य, दादरा नगर हवेली , उत्तरेला -मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, दक्षिणेस - कर्नाटक आणि अगदी दक्षिणेस - गोवा राज्य आहे. राज्याच्या पश्र्चिम सीमेलगत अरबी महासागर पसरलेला आहे.


महाराष्ट्र उद्योग- Maharashtra Industries:


महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले राज्य आहे. तर मुबंई हे भारतातील प्रमुख औद्योगिक-आर्थिक केंद्र मानले जाते.


राज्याचा विकास होण्याकरिता पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. यादृष्टीने महाराष्ट्रातील विविध औद्योगिक विकास महामंडळे, मुंबई हे आंतरराष्ट्रीय बंदर, वाहतूक संदेशवहनाच्या अत्याधुनिक सुविधा, वित्तीय संस्था महामंडळे, पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा, मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर यांसारखी औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे राज्याच्या औद्योगिक विकासामधे मोलाचा वाटा उचलत आहेत. ऑगस्ट १९९१ ते डिसेंबर, २००८ या कालावधीत ,०४,६८९ कोटी रु. गुंतवणुकीच्या एकूण १४,९७५ उद्योगांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे


देशाच्या एकूण औद्योगिक गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १०% असून त्यामधून देशातील एकूण रोजगार उपलब्धतेच्या १५% रोजगार प्राप्त होतो. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २३% आहे. (या विभागातील आकडेवारीमहाराष्ट्राची आर्थिक पाहणी : २००८ -०९ नुसार अद्ययावत करण्यात आली आहे.)

 

महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचे प्रकार - Types of Businesses in Maharashtra:


 . कृषी उत्पादनांवर आधारित उद्योग - यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग, तेलगिरण्या, तंबाखू प्रक्रिया, डाळ मील, वाईन, रबर उद्योग यांसारख्या उद्योगांचा समावेश होतो.


. खनिज उत्पादनांवर आधारित उद्योग - यामध्ये लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र, यंत्रोद्योग यांचा समावेश होतो.


. वन उत्पादनांवर आधारित उद्योग - लाकूड कापण्याच्या गिरण्या, कागद कारखाने, आगपेट्यांचे कारखाने, औषधे निर्मिती, खेळांचे साहित्य, फर्निचर निर्मिती उद्योग यांचा समावेश होतो.


. प्राणिज उत्पादनांवर आधारित उद्योग - यामध्ये कातडी उद्योग, लोकरी कापडाच्या गिरण्या, रेशीम उद्योग, दुग्धजन्य पदार्थ उद्योग यांचा समावेश होतो.


त्याच बरोबरीने बांधकाम उद्योग, पर्यटन उद्योग, सेवा क्षेत्र, वाहन उद्योग, प्रकाशन मुद्रण उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, करमणूक उद्योग हे सर्व उद्योग जोमाने वाढत आहेत.


इतर लेख वाचा: =============================================


Spardhankur  (युट्यूब चॅनेल):

https://www.youtube.com/channel/UCLM5rHq-TdFhg9desmbBzPw


स्पर्धांकुर MPSC (टेलिग्राम ग्रुप):

https://t.me/spardhankur


MPSC संपूर्ण तयारी (टेलिग्राम चॅनेल):

https://t.me/official_mpscalert


स्पर्धा परीक्षा माहिती मंच( फेसबुक पेज)

www.facebook.com/spardhankur

Post a Comment

Previous Post Next Post