सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Apr 6, 2021

विधेयकांचा तुलनात्मक अभ्यास


:red_circle🟣 सार्वजनिक विधेयक (Public Bill)

:small_orange_diamond:फक्त मंत्री संसदेत मांडतात.

:small_blue_diamond:सरकारी धोरणे प्रदर्शित करतात.

:small_orange_diamond:पारित होणे तुलनेने सोपे

:small_blue_diamond:विधेयक फेटाळल्यास संसदेचा सरकारवर विश्वास नाही, असा अर्थ होतो.

:small_orange_diamond:विधेयक मांडण्यापूर्वी 7 दिवसांची पूर्वसूचना द्यावी लागते. विधी खात्याशी चर्चा करून संबंधित खाते याचा मसुदा बनवते.

🟣 खासगी विधेयक (Private Bill)

:small_orange_diamond: खासगी (मंत्र्यांव्यतिरिक्त) सदस्य मांडतो.

:small_blue_diamond:सार्वजनिक मुद्द्याबाबत विरोधी पक्षाची भूमिका प्रदर्शित करतात.

:small_orange_diamond:पारित होणे तुलनेने अवघड असते.

:small_blue_diamond:विधेयक फेटाळण्याचा अर्थ संसदेचा सरकारवर अविश्वास असा होत नाही.

:small_orange_diamond:विधेयक मांडण्यापूर्वी एका महिन्याची पूर्वसूचना द्यावी लागते.

:small_blue_diamond:विधेयक तयार करण्याची जबाबदारी संबंधित सदस्याची असते.

:small_orange_diamond:सार्वजनिक व खाजगी विधेयक पारित मात्र सारख्याच पद्धतीने होतात.

Nov 3, 2020

चालू घडामोडी - ०३ नोव्हेम्बर २०२० | MPSC Alert

 :small_red_triangle_down:1111

1. यशवर्धन सिन्हा: भारताचे नवे मुख्य माहिती आयुक्त:small_red_triangle::small_red_triangle:


:cyclone:भारत सरकारने पुढील मुख्य माहिती आयुक्त (CIC) या पदासाठी यशवर्धन सिन्हा यांची निवड केली आहे.

:cyclone:यशवर्धन सिन्हा हे वर्तमानात माहिती आयुक्तपदी आहेत. ते परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी आहेत.

:part_alternation_mark:केंद्रीय माहिती आयोग (CIC) विषयी

:cyclone:केंद्रीय माहिती आयोग ही ‘माहिती अधिकार अधिनियम-2005’च्या तरतूदीनुसार 12 ऑक्टोबर 2005 रोजी स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.

:cyclone:आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत-जास्त दहा माहिती आयुक्त असतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त 5 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत पदावर राहतात.