आता असे कोणतेही क्षेत्र उरलेले नाही जिथे महिलांनी स्वतःला सिद्ध केले नसेल. जगातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुष्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्या देशातील मिलिटरी आणि पोलिस दलातही महिला उच्च पदांवर कार्यरत आहेत. आज आपण देशातील अशा आघाडीच्या आयपीएस महिला अधिकाऱ्यांना पाहणार आहोत ज्यांनी हे सिद्ध केले आहे की ते कठीण परिस्थितीतही इतके चांगले काम करू शकतात. आयपीएस अधिकारी बनण्याकरिता देशातील यूपीएससीची सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.