सुस्वागतम !!! MPSC Alert ह्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे.

Jun 28, 2014

राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौसेना अकादमीत 375 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौसेना अकादमी परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या द्वारे राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 320 व नौसेना अकादमीत 55 अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 21-27 जून 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 

अधिक माहिती www.upsc.gov.in  व www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Jun 26, 2014

प्रश्न मंजुषा - 17

1. भारताचे नवे Atorny General कोण?

A. रणजीत कुमार
B. सारंग रोहतगी
C. मुकुल रोहतगी
D. करण शुक्ला-------------------------------------------------------------------------------------------

2. नुकत्याच जागतिक सातही खाड्या पोहण्याचा पराक्रम कोणत्या मराठी मुलाने केला आहे?

A. प्रवीण गुप्ते
B. वीरधवल खाडे
C. विक्रम पतरंगे
D. अमोल आढाव-------------------------------------------------------------------------------------------

3. भारताचे नवे Solicitor general कोण?

A. रणजीत कुमार
B. आशुतोष कपाडिया
C. सुरज बेहेल
D. शशिकांत जोशी-------------------------------------------------------------------------------------------

4. कृषी क्षेत्रातील नोबेल समजल्या जाणारे 'वर्ल्ड फुड प्राईज' कुणाला जाहीर झाले आहे?

A. एस. गंगाराम
B. पी. आर. राव
C. संजय राजाराम
D. विजय भारद्वाज-------------------------------------------------------------------------------------------

5. नुकताच 2013 चा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला जाहीर झाला आहे?

A. केदारनाथ सिंग
B. आर. के. नारायण
C. रश्मी बन्सल
D. अरविंद अडिगा-------------------------------------------------------------------------------------------

Jun 22, 2014

संगीत नाटक अकादमीचे उस्ताद बिस्मिला खाँ युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील कलाकारांचा समावेश

संगीत नाटक अकादमीच्या बहुप्रतिष्ठीत उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्काराची घोषणा सोमवारी नवी दिल्ली येथे करण्यात आली. संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक लोककला या क्षेत्रातील 33 युवा कलाकारांना हा पुरस्कार आज संगीत नाटक अकादमीने जाहीर केला. 

देशभरातील या क्षेत्रातील युवा कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी संगीत नाटक अकादमीद्वारे वर्ष 2006 पासून उस्ताद बिस्मिला खाँ पुरस्कार देण्यात येतात. संगीत, नृत्य, नाटक, पारंपारिक लोककला या क्षेत्रातील 40 वर्षाखालील कलाकारांना हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये संगीत विभागात पुढील कलाकारांचा समावेश आहे. भुवनेश कोमकली (हिंदुस्तानी गायन), कुमार सोमनाथ मर्दुर (हिंदुस्तानी गायन), सावनी तळवलकर (हिंदुस्तानी वाद्य संगीत-तबला), रंजनी व गायत्री बालसुब्रह्मण्यम (कर्नाटक गायन), गायत्री गिरीश (कर्नाटक गायन), एन. गुरुप्रसाद –(कर्नाटक वाद्य संगीत-घटम), बी. सी. मंजुनाथ (कर्नाटक वाद्य संगीत-मृदंगम), अनिरुद्ध अत्रेय (कर्नाटक संगीत-कंजीरा).

भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये 54 जागा

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमध्ये वैद्यकीय अधिकारी (1 जागा), तांत्रिक अधिकारी (14 जागा), वैज्ञानिक सहायक (20 जागा), सहायक (19 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.bhavinionline.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

मुंबई उच्च न्यायालयात कोर्ट मॅनेजरच्या 22 जागा

मुंबई उच्च न्यायालयात व राज्यातील जिल्हा व सत्र न्यायालया आस्थापनेवर वरिष्ठ व्यवस्थापक (2 जागा), कोर्ट मॅनेजर (20 जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2014 आहे. अधिक माहिती http://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

Jun 3, 2014

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक टंकलेखकाच्या - 1300 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील लिपिक टंकलेखक-मराठी (408 जागा) व लिपिक टंकलेखक- इंग्रजी (40 जागा) आणि बृह्नमुंबईतील विविध कार्यालयातील लिपिक टंकलेखक-मराठी (782 जागा), लिपिट टंकलेखक- इंग्रजी (70 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जून 2014 आहे. 
अधिक माहिती http://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.